रायटर प्रकाशनविषयी
रायटर प्रकाशन या संस्थेमध्ये लेखक नितीन थोरात यांची सर्व पुस्तके प्रकाशित होतात. थोरात यांची अनेक पुस्तके वेगवेगळ्या प्रकाशकांकडे होती. त्यामुळे वाचकांची नेहमी अडचण होत असे. ही अडचण ओळखून सर्व पुस्तके एकाच छताखाली मिळावीत म्हणून नितीन थोरात यांनी एप्रिल २०२४ मध्ये रायटर पब्लिकेशन ही संस्था सुरू केली. अवघ्या पाच महिन्यात या संस्थेने २० हजार पुस्तक विक्रीचा टप्पा ओलांडला असून हा ओघ असाच सुरु राहिल यात शंका नाही.
अधिक माहितीसाठी ८१८००१०३०७ यावर संपर्क साधू शकता.
नितीन थोरात
( लेखक - प्रकाशक )
नितीन थोरात हे पुणे जिल्ह्यातल्या पिंपळगावचे. गावाकडं दहावीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्यातल्या एसपी कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली. लेखनाची आवड असल्यानं त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा आणि मास कम्युनिकेशनची डिग्री घेतली. त्यानंतर त्यांनी पुढारी, लोकमत आणि सकाळ या वृत्तपत्रांमध्ये बारा वर्षे उपसंपादक म्हणून काम पाहिलं. २०१५ मध्ये त्यांनी सूर्याची सावली ही कादंबरी लिहिली. या त्यांच्या पहिल्याच कादंबरीला राज्यशासनाचा श्री. ना. पेंडसे पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून पुर्ण वेळ लेखन करण्याचा निर्णय घेतला. थोरात यांनी आजवर साधू, कोप, सूर्याची सावली, खंडोबा, अंबालक्ष्मी, सोंग, पेटलेलं मोरपीस या कादंबरी लिहिल्या आहेत. खुशबू आणि कल्पी हे त्यांचे कथासंग्रहही उपलब्ध आहेत. सोंग, पुढचं सोंग, पेटलेलं मोरपीस, पेटलेलं मोरपीस भाग दोन, पेटलेलं मोरपीस भाग तीन, मरडेल, गण्या लव्ह कॅरोलिना या त्यांच्या ऑडिओ कादंबरी स्टोरीटेल या ऑडिओ बुक ॲपवर उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे थोरात यांना इयत्ता दहावीत इंग्रजी विषयात ३५ गुण पडले होते. पण, आज त्यांच्या पेटलेलं मोरपीस या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद करण्यात आला आहे.
